• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home राज्य

Women’s safety and st bus सन्मानासह सुरक्षाही हवी!

no1maharashtra by no1maharashtra
19/06/2023
in राज्य, विशेष लेख
0
Women’s safety and st bus सन्मानासह सुरक्षाही हवी!

महिलांना तिकीटात 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
The state government has decided to give 50 percent discount in tickets to women

सन्मानासह सुरक्षाही हवी!

महिलांना तिकीटात 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे
राज्य परिवहन महामंडळाची लालपरी (एसटी) ही ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठापर्यंत लालपरी सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहचवते. एसटी प्रवास सुरक्षित असतो. यामुळेच अनेक महिला देखील एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. एसटीतर्फे 65 वर्ष पूर्ण झालेल्यांना अर्धा तिकिटाच्या रकमेत प्रवास होता. त्यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत 75 वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे. त्यानंतर आता महिलांना तिकीटात 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत झाले.
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील 5 कोटी 41 लाख 19 हजार 106 महिलांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. मात्र, आता या संख्येत मागील दहा वर्षांत मोठी वाढ झाली आहे. ज्या महिला कामानिमित्त नेहमीच लांब पल्ल्याचा प्रवास करतात, त्यांना या योजनेचा मोठा फायदा होत आहे. राज्य सरकार सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबविणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील विविध पर्यटन, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी महिलांना जाता येणार आहे. महामंडळाने महिलांना धार्मिक स्थळांची दर्शनयात्रा व्हावी यासाठी स्पेशल बस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परंतु प्रवास करतांना मौल्यवान वस्तू, सामानाची चोरी, महिलांची छेड काढणे, महिलांचे अपहरण असे प्रकार देखील घडत असतात. यामुळे महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण होत आहे. राज्य शासनाने महिलांना सन्मानासह सुरक्षाही द्यायला हवी. त्यासह महिलांनी स्वत:ची सुरक्षा स्वत: करण्यासाठी काही बाबींचे पथ्य पाळले पाहिजे.
  • काय करायला हवे?
शासनाने महिलांना सन्मान दिला. त्याप्रमाणे महिलांना बसमध्ये सुरक्षाही पुरविण्यात यायला हवी. लांब पल्ल्याच्या बसमध्ये एक महिला सुरक्षा रक्षकाची नेमणुक करावी. जेणेकरुन महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होईल. बसमध्ये जीपीएस ट्रॅकरची सुविधा बसवून बस कोठे उभी आहे, कोणत्या रस्त्याने जात आहे याचे थेट स्थळ माहिती (लाईव्ह लोकेशन) घ्यायला हवे. नादुरुस्त तसेच जुन्या बसेसद्वारे महिलांना लांबच्या प्रवासाला नेण्यात येऊ नये. यासाठी एसटी महामंडळाने नियोजन करायला हवे. महिलांसाठी एक हेल्पलाईन नंबरची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळातर्फे करायला हवी. जेणेकरुन काही अडचण निर्माण झाल्यास महिलांना तात्काळ संपर्क साधता येऊ शकेल.
  • काय करु नये?
महिला ही आता ‘मिळुन साऱ्या जणी’ प्रवास करत आहेत. प्रवासाचा आनंद घेत आहे. स्वत:चे नातेवाईकांकडे जात आहे. माहेराला जाऊन कुटूंबातील आई-वडील-भाऊ, हॉस्टेलमधील मुलगा-मुलगी यांना भेटून येत आहे. मित्र-मैत्रिणी, आप्तेष्ट यांच्या लग्न समारंभात महिला मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. असे असले तरी महिलांनी सुरक्षिततेला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. महिलांनी एसटी मधून प्रवास करतांना नेहमी त्यांचे मौल्यवान दागिने, सोन्याच्या-चांदीच्या वस्तू, रोख रक्कम या बॅगमध्ये, पर्समध्ये सुरक्षित ठेवाव्यात. मौल्यवान दागदागिने घालून प्रवास करु नये. लांब पल्याचा प्रवास असल्यास मौल्यवान वस्तुची बॅग-पर्स स्वत:जवळ बाळगावी. बॅग-पर्स सीटवर ठेवून बसच्या बाहेर उतरु नये. अनोळखी व्यक्ती, परराज्यातील व्यक्ती यांच्याशी जास्त बोलू नये. कोणी दिलेले थंड पेय, पदार्थ खावू नये. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यॅुरोच्या आकडेवारीनुसार उत्तरप्रदेश त्या खालोखाल बिहार, पश्चिम बंगाल राज्यात तेथील महिलांना थंड पदार्थाच्या माध्यमातून गुंगीकारक औषधे, द्रव्यपदार्थ देवुन अपहरण करण्याच्या घटनेमध्ये वाढ झालेली दिसुन येत आहे. याचे भान ठेवून महिलांनी स्वत:ची काळजी घ्यावी.
  • खाजगी वाहनांच्या मालकांनी देखील विचार करावा?
एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केला आणि त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. आता त्यापाठोपाठ चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी देखील आपल्या बसमध्ये महिलांना 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. मात्र एवढ्यावर थांबता कामा नये. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील खाजगी वाहन मालकांनी, ट्रॅव्हल्स असोसिएशनने देखील महिलांना प्रवासात 50 टक्के सुट देण्याचा निर्णय विचार विनिमय करुन घ्यायला हवा. खाजगी वाहनांमध्येही महिलांना 50 टक्केची सुट देण्यासाठी प्रयत्न करायला हवे. यामुळे खाजगी वाहनांचेही उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • आता पुढचे पाऊल काय?
पुरोगामी राज्य म्हणुन महाराष्ट्राची देशात ख्याती आहे. महिला शिक्षणापासून सुरुवात होऊन ते विधवा पुर्नविवाह व त्याहीपुढे जाऊन सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर महिला विराजमान होत आहे. कोणत्याही राज्याची प्रगती, उत्कर्ष याचे मुल्यमापन तेथील महिलांना किती मोकळीक दिली जाते, किती सामाजिक स्वातंत्रता देण्यात येते, यावरुन केले जाते. दिल्ली सरकार, पंजाब सरकार याप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारने सुध्दा महिला उन्नतीसाठी पुढचे पाऊल म्हणून एसटी प्रवास मोफत करण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवा. सामान्य महिला केंद्रस्थानी ठेवून पुढील महिला धोरणाची आखणी करायला हवी.
लेखिका : सिमाताई मराठे, धुळे मो. 9028557718
महिलांना देखील 50 टक्के तिकीटात सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे
Tags: abp mazachya batmyaadani scam newsajit pawar statementsamit shah news in gujrathbacchu kadu mlaCabinet decisiondevendra fadnvis bhashan in nagpureknath shinde speechkunal patil mlamaharashtra newsmarathi newsnarendra modi speech in 2014narhari zirwalnews livenilesh lankeprajakta tanpurerais shekhrajendra vaghmareseematai marathe dhuleThe state government has decided to give 50 percent discount in tickets to womentv9vishvjit kadamWomen's safetyWomen's safety and st busyshomati thakurzee 24 tas
ADVERTISEMENT
Previous Post

Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme मृत्यू झाल्यास दोन लाख, कायमचे अपंगत्व आल्यास एक लाखाची मदत

Next Post

National Senior Citizen Helpline राष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक हेल्पलाईन स्वयंसेवकपदी शेखर कुळकर्णी

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us