Give ten thousand rupees honor money to domestic workers! घरेलू कामगार महिलांना दहा हजार रुपये सन्मान धन द्या!
#dhule धुळे: दहा हजार रुपये सन्मान धन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी घरेलू कामगार महिलांनी जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात घरेलू कामगारांची नोंदणी सुरू करावी, कोरोना काळात जाहिर केलेली 1500 रुपये मदत त्वरीत द्यावी, सुविधा केंद्रातील एजंटगिरी बदं करावी, मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ द्यावा, ई श्रम कार्डधारकांना योजनांचा लाभ द्यावा आदी मागण्या केल्या आहेत.
यावेळी घरेलू कामगार संघाच्या जिल्हाध्यक्षा संगिता चौधरी, कार्याध्यक्षा शांता गोटे, सरचिटणीस लक्ष्मी ठाकूर, संगिता वंजारी, गंगूबाई गवळी, प्रदेश सरचिटणीस शिवाजी काकडे यांच्यासह घरेलू कामगार महिला उपस्थित होत्या.