shivshahi mahanatya
अफजल खानाचा कोथळा म्हणजे शिवाजी महाराज नव्हेत! शिवशाही महानाट्य नक्की पहा…
Dhule News धुळे: आजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास हा केवळ अफजल खानाचा वध किंवा मुस्लीम व्देष्टा असा साकारण्यात आलाय. परंतु लेखक, निर्माते, दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांनी या गोष्टींना अभ्यासपूर्ण फाटा दिलाय. चित्रपट आणि टीव्ही मालिकांतील मोठ्या कलाकारांची भूमिका असलेले ‘शिवशाही महानाट्य’ रंगमंचावर सादर होत आहे. या ऐतिहासिक महानाट्यात प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल जिजाऊंची भूमिका साकारत आहेत. धुळ्यातील प्रसिद्ध मेंदू व मणके विकार तज्ज्ञ डॉ. सुशिल महाजन यांच्या पुढाकाराने धुळेकर रसिकांना ही मेजवानी मिळणार आहे.
धुळे शहरात एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनपटावरील विविध महान पैलूंवर प्रकाश टाकणारे महानाट्य २६, २७ आणि २८ मार्च रोजी सादर होत आहे. तमाम रसिक प्रेक्षकवर्ग बसलेल्या मैदानाचाच रंगमंच म्हणून वापर करण्यात आला आहे हे विशेष. जिजाऊ आणि शिवबा असे महान कतृत्व पुन्हा जन्म घेणे शक्य नाही पण त्यांचे कलागूण हे प्रत्येकाच्या अंगाअंगात भिणावे यासाठी तमाम जनतेने हे महानाट्य व त्याचा भव्यदिव्यपणा याची देही याची डोळा जरूर बघावा, असे आवाहन कलावंतांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
या महांनाट्याचे प्रायोजकत्व डॉ. सुशिल महाजन यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी लेक अलका कुबल-आठल्ये ह्या तब्बल १८ वर्षानंतर मराठी रंगमंचावर जिजाऊ यांचे कणखर व्यक्तिमत्व साकारणार आहेत. तसेच अखंड महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या दमदार भूमिकेतून घराघरात पोहचवणारे शंतनू मोघे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दमदार भूमिकेतून छत्रपती बघायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे छत्रपतीचे विविध शिलेदार व मावळे यांचे जिवंत दर्शन महेश कोकाटे, रमेश रोकडे, डॉ. राजेश आहेर, प्रकाश धोत्रे हे घडवणार आहेत. विजय हिरे, अॅड.मयुर बैसाणे, प्रेम सोनार व विशाल चव्हाण यांनी या महानाट्याचे आयोजन केले आहे.
दरम्यान, कृषी व हवामानतज्ज्ञ पजाबराव डक यांच्याशी डॉ. सुशिल महाजन यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला असता, धुळे शहरात व जिल्ह्यात दोन एप्रिलपर्यंत तरी पावसाची शक्यता नाही असे कळाले. तरीही हवानामाची व पावसाची चिंता न बाळगता धुळेकरांनी या महानाट्याचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सुशिल महाजन यांनी केले आहे.