Take strategic action against attackers! Demand of Lok Jan Shakti Party
हल्लेखोरांवर मोक्कांतर्गत कारवाई करा! लोक जनशक्ती पार्टीची मागणी
Dhule Crime धुळे : फाईट ग्रुप या बेकायदेशीर संघटनेचा म्होरक्या ज्ञानसागर साळवे ऊर्फ नाना साळवे व त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीने केली.
धुळे शहरात नऊ एप्रिल रोजी रात्री एक घटना घडली. ज्ञानसागर विठ्ठल साळवे आणि शंभर ते दीडशे गावगुंडांनी लोकजनशक्ती पार्टीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शोभा चंद्रकांत चव्हाण यांच्या घरात घुसून हल्ला चढवला, असे निवेदन पोलीस अधीक्षकांना बुधवारी दिले. या हल्ल्यात तलवारी, काठ्या, ज्वलनशील पदार्थ वापरले. यात सिध्दार्थ साळवे गंभीर जखमी झाले. याबाबत शोभा चव्हाण यांनी अधिक माहिती दिली.