MLAs taunt Anup Aggarwal ‘Mukabala to hamara samandarose hai, aur gutre yuhi shore macha rahi’
‘मुकाबला तो हमारा समंदरोसे है, और गटरे युही शोर मचा रही’ अनुप अग्रवाल यांना आमदारांचा टोमणा
Dhule News धुळे : ‘मुकाबला तो हमारा समंदरोसे है, और गटरे युही शोर मचा रही|’ असा टोमणा आमदार फारुक शाह यांनी अनुप अग्रवाल यांना मारला. खासदार सुभाष भामरे आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी धुळे महानगरपालिका विकून खाल्ली, असा थेट आरोपही त्यांनी सोमवारी केला. रस्ते कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
धुळे महानगरपालिकेच्या उप महापौर वैशाली वराडे यांच्या पदग्रहण सोहळ्यात अनुप अग्रवाल यांनी, ”आमदार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहेत.”, असा थेट आरोप केला होता. या आरोपाला आमदारांनी आज चोख प्रत्युत्तर दिले.
“अनुप अग्रवाल यांची राजकीय कुवत नाही. ते हेतुपूर्वक आमच्या पायांवर येत आहेत. त्यांच्यात जनतेतून निवडून येण्याची क्षमता नाही. पक्षातील वरीष्ठांची हुजरेगिरी करून आणि विशेष सेवा करून ते मागच्या दाराने विधानसभेत जाऊ शकतात. अनुप अग्रवाल कोण आहेत आणि ते काय करतात हे धुळेकर जनतेला चांगलेच ठाऊक आहे. खासदार सुभाष भामरे, अनुप अग्रवाल यांनी महापालिका विकून खाल्ली “, असे प्रत्युत्तर आमदारांनी दिले.
‘मुकाबला तो हमारा समंदरोसे है, और गटरे युही शोर मचा रही|’ असा टोमणाही आमदारांनी मारला.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मध्ये १०० फुटी रोडपासून युसुफ मुल्ला ते साबीर शेठ कॉम्प्लेक्सपर्यंत काँक्रिटीकरण करणे या ४९ लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या हस्ते सोमवारी झाला.
यावेळी नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक मुक्तार अन्सारी, नगरसेवक युसुफ मुल्ला, नगरसेवक आमिर पठाण, नगरसेवक सइद बेग, डॉ. दीपाश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, नासिर शाह, अनिस शाह, इकबाल शाह, आसिफ शाह, मुदस्सर शेख, माजीद पठाण, अजहर सैय्यद, डॉ. बापुराव पवार, जमीर शेख, इरफान शेख, जुबेर मुल्ला, जैद् अन्सारी, गुड्डू काझी, इमरान शेख, सलमान खान, अदनान मिर्झा, नदीम मुल्ला, दाऊद सय्यद, जालीम शमसुद्दिन आदी उपस्थित होते.