लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे काम लवकरच!
Dhule News धुळे : लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या स्मारकाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वाकडे यांनी यावेळी दिली.
धुळे शहरात फाशीपूल लेनीन चौकात आयोजित जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात महापौर प्रतिभा चौधरी, भाजप महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शिवसेना महानगर प्रमुख डॉ. सुशील महाजन, संजय शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीतराजे भोसले यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील लेनिन चौकात विविध पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका यमुनाताई जाधव, रवींद्र वाकडे, बंडू गांगुर्डे, रामकृष्ण नेरकर, बबनराव गायकवाड, वाल्मीक जाधव, अमृत कांबळे, अनिल रामराजे, देवा कढरे, दशरथ शिंदे, संदीप पवार, अरुण वाकडे, गुलाब कदम, मयूर मरसाळे, सागर आव्हारे , पप्पू वाकडे, सोमनाथ पवार उपस्थित होते.