शाळा, महाविद्यालयातील क्रीडांगणांच्या विकासासाठी सात लाखांचे अनुदान
Dhule News धुळे : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजनांतर्गत सन 2023-2024 वर्षांसाठी क्रीडांगण विकास अनुदानासाठी 18 ऑगस्ट, 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे मार्फत सन २०२३-२४ क्रीडांगण विकास अनुदानासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालीका,जिल्हा परिषद, कॅन्टोनमेंट बोर्ड शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग यानी मान्यता दिलेल्या शाळा व महाविद्यालये तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विकास,सामाजिक न्याय विभाग तसेच अल्पसंख्यांक विभाग मार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, शासकीय ग्रामीण रुग्णालय, शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच शासनाव्दारे मान्यता दिलेल्या शैक्षणीक शाळा व महाविद्यालय यांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून 5वर्ष पूर्ण झालेल्या शाळा व महाविद्यालये या अनुदानासाठी पात्र असतील. तसेच क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी, पोलीस विभाग, शासकीय कार्यालय सुद्धा यासाठी प्रस्ताव सादर करु शकतात.
क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे. २०० मीटर अथवा ४०० मीटर धावनमार्ग तयार करणे. क्रीडांगणास भिंतींचे, तारेचे कुंपण घालणे. विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगण तयार करणे. प्रसाधन गृह, चेजींग रूम बांधणे. पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे. क्रीडा साहीत्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे. क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे. क्रीडा साहीत्य खरेदी करणे. क्रीडांगणावर मातीचा , सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे. प्रेक्षक गॅलरीवर, आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे. क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे. निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबींसाठी क्रीडा उपक्रमांची आवश्यता असल्याची खात्री केल्यानंतर अनुदान मंजूर करण्यात येते.
वरील बाबींपैकी कोणत्याही एका बाबीसाठीच एका वर्षात अनुदान उपलब्धतेनुसार अंदाजीत खर्चाच्या 100 टक्के किंवा कमाल 7 लक्ष पर्यंतचे अनुदान यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम मंजूर करण्यात येईल. क्रीडा साहीत्यासाठी कमाल 3 लाख मर्यादा राहील. क्रीडा साहीत्य मागणी प्रस्तावांसाठी शाळा , महाविदयालय , वसतिगृहे यांच्याकडे सदर मैदाने, हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या संस्थांनी यांनी अनुदान मागणीचे प्रस्ताव व अर्जाचा विहीत नमून्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाडीभोकर रोड, देवपूर धुळे येथे दिनांक 27 जुलै,2023 ते 18 ऑगस्ट,2023 पर्यंत या कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन अर्ज प्राप्त करुन घेवून अर्जासोबत जोडलेल्या यादीनुसार आवश्यक त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह परीपूर्ण प्रस्ताव मुळ एका प्रतीत सादर करावेत. अपूर्ण असलेले व दिलेल्या विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही असे जिल्हा क्रीडा अधिकारी, धुळे यांनी कळविले आहे.
हेही वाचा