• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home क्राईम

Legal Aid Defense महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तिघांची लोक अभीरक्षकामुळे निर्दोष! जाणून घ्या काय आहे लोक अभीरक्षक?

लोक अभिरक्षक यांच्या प्रयत्नाने सत्र खटल्यातुन आरोपींची निर्दोष मुक्तता

no1maharashtra by no1maharashtra
18/08/2023
in क्राईम, धुळे
0
Legal Aid Defense महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तिघांची लोक अभीरक्षकामुळे निर्दोष! जाणून घ्या काय आहे लोक अभीरक्षक?

जाणून घ्या काय आहे लोक अभीरक्षक?

0
SHARES
248
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तिघांची लोक अभीरक्षकामुळे निर्दोष! जाणून घ्या काय आहे लोक अभीरक्षक?

धुळे : पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे सन २०१२ साली पिडीतेवर अत्याचार झाल्या प्रकरणी ३ लोकांविरुध्द बलात्कार, संगणमताने दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासाअंती दोषारोपत्र दाखल करून सदरचा खटला सत्र न्यायालयात चालविण्यात आला होता. या खटल्याचा अंतिम निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांच्या न्यायालयात झाला असून, आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्याचे मुख्य लोक अभिरक्षक यानी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व आरोपीची बाजू प्रभावीपणे न्यायालयासमोर मांडली त्यामुळे सत्र न्यायालयाने या आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. असे लोक अभिरक्ष कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक ॲड . ज्ञानेश्वर महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सदर खटल्यात आरोपीच्या वतीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांनी नियुक्त केलेले मुख्य लोक अभिरक्षक अॅड. ज्ञानेश्वर एस. महाजन यांनी मोफत कामकाज चालविले व त्यांना उप लोक अभिरक्षक अँड अबरार सी. सय्यद, सहाय्यक लोक अभिरक्षक अँड. मुकेश पी. पाचपुते, अॅड, रमीज शेख, अॅड. भाग्यश्री एस. बाप, अॅड. मोक्षा आर. कोचर यानी मोलाचे सहकार्य केले. आरोपी हे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्यामुळे त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांच्याकडे त्यांचा खटला चालविण्याकामी शासन खर्चाने मोफत वकील मिळण्यासाठी अर्ज केला होता. कारण ते खाजगी वकीलांची फि देऊ शकत नव्हते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांनी आरोपीचे कामकाज चालविणे कामी सदरचा खटला  लोक अभिरक्षक कार्यालयाकडे वर्ग केला व मुख्य लोकअभिरक्षक अँड. ज्ञानेश्वर महाजन यांनी स्वतः सदर खटला मोफत चालविला.
काय आहे लोक अभिरक्षक (विधी सहाय्य बचाव पक्ष ) प्रणाली
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांनी प्रत्येक जिल्ह्यात ज्या न्यायबंदी अथवा गरजू व्यक्ती खाजगी वकील लावण्याची आर्थिक परिस्थीती नाही असे न्यायबंदी अथवा आरोपी न्यायापासून वंचित राहु नये व न्यायालयात त्यांची बाजु प्रभावीपणे मांडण्याकरीता शासन खर्चाने मोफत वकील मिळावा याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांनी विधी सहाय्य बचाव पक्ष म्हणजेच लोक अभिरक्षक प्रणाली सुरू केली आहे.
त्याचाच भाग म्हणून धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यानी लोक अभिरक्षक म्हणून तज्ञ वकीलांची नियुक्ती केलेली आहे. त्या अन्वये लोक अभिरक्षक कार्यालयात मुख्य लोक अभिरक्षक, उप लोक अभिरक्षक व सहाय्यक लोक अभिरक्षक म्हणून म्हणुन तज्ञ वकीलांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोक अभिरक्षक कार्यालयातील सर्व लोक अभिरक्षक दैनंदिन होत असलेल्या कायद्यांमधील बदल तथा मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या विविध न्यायनिवाडयांचा अभ्यास करून लोक अभिरक्षक कार्यालयात आलेल्या प्रत्येक खटल्यातील आरोपीची बाजु प्रभावीपणे मांडतात.
राष्ट्रीय, राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे मार्फत कार्यान्वीत झालेले लोक अभिरक्षक प्रणाली द्वारे धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात स्वतंत्ररित्या लोकअभिरक्षक कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात मुख्य लोक अभिरक्षक अॅड. ज्ञानेश्वर एस. महाजन, उप लोक अभिरक्षक अँड अबरार सी. सय्यद, सहाय्यक लोक अभिरक्षक अँड मुकेश पी. पाचपुते, ॲड . रमीज एच. शेख, अँड. भाग्यश्री एस. वाघ, अँड. मोक्षा आर. कोचर हे सर्व विधीज्ञ गोरगरीब, वंचीत व गरजु आरोपीची प्रभावीपणे बाजु न्यायालयासमोर मांडत आहेत व गरजू लोकांना न्याय मिळवून देत आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांचे लोक अभिरक्षक प्रणालीद्वारा महिला, न्यायबंदी, अनुसुचित जाती,जमाती, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा कमी आहे तथा गरजु व न्यायापासून वंचीत राहणाऱ्या आरोपींना याचा लाभ मिळणार आहे.तरी यांचा गरजुंनी लाभ घ्यावा, असे मुख्य लोक अभिरक्षक ॲड. ज्ञानेश्वर महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
No1 Maharashtra News Portal
Tags: dhule newsindia newsLegal Aid DefenseLegal Aid Defense Systemmaharashtra newsno1 maharashtra news portalWhat is a public guardian?काय आहे लोक अभिरक्षक?विधी सहाय्य बचाव पक्षविधी सहाय्य बचाव पक्ष प्रणाली
ADVERTISEMENT
Previous Post

Adulteration in milk तुमच्या शहरात कोणत्या डेअरीवर होते दुधात भेसळ? वाचा सविस्तर…

Next Post

Dhule Trap पाच लाखांची लाच स्वीकारताना विशेष लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Dhule Trap पाच लाखांची लाच स्वीकारताना विशेष लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Dhule Trap पाच लाखांची लाच स्वीकारताना विशेष लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us