तापी पुलाला मोठा खड्डा, वाहतूक बंद!
धुळे : तापी नदीवरील सारंगखेडा – टाकरखेडा येथील पुलाला मोठा खड्डा पडल्याने सदरचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दोंडाईचा आणि शहादा येथून वाहतूक रोखण्यात आली आहे.
सर्व नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन धुळे तसेच नंदुरबार जिल्हा प्रशासनाने केले आहे.