राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस संतोष मराठे यांचा विखरणला जाहीर सत्कार
शिरपूर : तालुक्यातील विखरण येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संतोष मराठे यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या आदेशाने सामाजिक कार्यकर्ते संतोष पांडुरंग मराठे-साळुखे यांची महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती झाली. ते नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी विखरण येथील भूमीपुत्र असून सध्या मुंबई भोईसर येथे वास्तव्यास आहेत.
विखरण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मेळावा झाला. गाव आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शेतीपूरक उद्योग व्यवसाय, सुशिक्षित बेरोजगारांना व शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, सिंचन, पाण्याचे नियोजन, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी शासनाने सुरू केलेले जल जीवन मिशन, जन आरोग्य योजना, स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबरराव शंकर पाटील सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शहादा येथील उद्योगपती शाम जाधव, नाशिक यथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवा बोराणे उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाचे शिरपूर तालुका अध्यक्ष संजय खंडु पवार, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मराठा कल्याण सुरत ट्रस्टचे अध्यक्ष व स्वाभिमानी मराठा महासंघ गुजरात प्रदेशचे अध्यक्ष मनोज यशवंत पवार, माजी सरपंच शामकांत सुभाष पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी साहेबराव पाटील, काशीनाथ पाटील, किशोर पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक मनोज यशवंत पवार यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभाग शिरपूर तालुका अध्यक्ष संजय खंडु पवार यांनी केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी मनोज अशोक पाटील, दगाजीराव शिंदे, निरंजन पवार , संजय गंभीर पाटील, प्रविनण पुरुषोत्तम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाईदास पाटील, दिनेश लोटन पवार , नितीन पाटील, गोपाल चव्हाण, सोमनाथ शिंदे, विजय पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा