माजी सैनिक कॉलनीत आमदार निधीतून रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ
धुळे : आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत धुळे महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग क्रमांक एकमध्ये माजी सैनिक कॉलनी येथे 25 लक्ष खर्चातून रस्ते कॉंक्रिटीकरण करणे कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दीपश्री नाईक, डॉ. गिंदोडिया, गनी डॉलर, कैसर अहमद यांची उपस्थिती होती. यावेळी देविदास कुलकर्णी, ॲड. निलेश कुलकर्णी, जिजाबराव पवार ,पंडित वानखेडे, चिंतामण पाटील, रविकांत खंडारे, सुनील पाटील, भारत मराठी, प्रवीण पाटील, नरेश पाटील आदी उपस्थित होते.