मराठा आरक्षण आंदोलनाला सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा पाठिंबा
धुळे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात सकल मराठा समाजाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी धुळे शहरात क्युमाईन क्लब येथे आंदोलन स्थळी भेट देऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने केली.
यावेळी राकेश अहिरे, शरद वेंदे, अमोल शिरसाठ, हर्षल वाघ, हर्ष मोरे आणि सिद्धांत बागुल उपस्थित होते.
हेही वाचा