झेडपी सदस्य संग्राम पाटील यांच्यातर्फे तीन गावांना शवपेटी
धुळे : जिल्हा परिषद सदस्य संग्राम गोविंदराव पाटील यांनी आनंदखेडे, गोताणे, सांजोरी या तीन गावांना शवपेटी दिली.
आनंदखेडे येथे शवपेटी देताना सरपंच आणि तुळशीदास आहिरे, सतिश अमृतसागर, प्रविण जाधव, सुभाष रासणे, पोलीस पाटील संजय गवते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सांजोरी येथे शवपेटी देताना सरपंच गणेश गवळी, माजी उपसरपंच शंकर गवळी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
गोताणे येथे शवपेटी देताना सरपंच जिजाबाई झुलाल पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.