धुळे शहरातून तीन सख्ख्या बहिणींना पळविले, अपहरणाचा गुन्हा दाखल
धुळे : शहराच्या देवपूर भागातील नगावबारी परिसरातील तीन सख्ख्या बहिणींना कोणीतरी अज्ञात इसमांनी फूस लावून पळून नेल्याची घटना 20 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमाराला घडली. एकाच कुटुंबातील तीन मुलींना एकाच वेळी पळवून नेणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे या तीनही मुली अल्पवयीन आहेत. एका मुलीचे वय 16 वर्षे, दुसरीचे 15 वर्षे तर लहान मुलीचे वय 14 वर्षे आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, पोलीस निरीक्षक गवळी आणि पोलीस उपनिरीक्षक एम. इ. कचरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कचरे करीत आहेत.