धुळे शहर जिल्हा काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्ती पत्राचे वाटप
धुळे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते नुकतेच नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. शहर काँगे्रेसच्या पदाधिकार्यांच्या नियुक्तीमुळे धुळे शहरातील काँग्रेस पक्षात नवचैतन्य संचारले असून पक्षाच्या विस्तारासाठी बळ मिळणार आहे.
धुळे शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे यांनी धुळे शहर काँग्रेसच्या विविध पदाधिकार्यांची नियुक्ती करुन त्यांना नियुक्ती पत्र दिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथील आ.पाटील यांच्या संपर्क कार्यालयात नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.धुळे शहर काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी धुळे मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते हाजी साबीर शेठ, ज्येष्ठ नेते मुकुंदभाऊ कोळवले,सरचिटणीस म्हणून यामिनी जगदिश खैरनार यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शहर जिल्हा काँग्रेसच्या विविध पदांवर भिवसन अहिरे,हरीभाऊ चौधरी,दिपक गवळे,मुकेश खरात,समाधान मोरे, भटू चौधरी, जावेद देशमुख, ज्योती गुणवंत पाटील, दिपक पाटील,किशोर चौधरी,शकील अहमद, लहू पाटील,किशोर पाटील, रोहित चौधरी, राजेंद्र खैरनार, अरुण खैरनार, अशोक शिरसाठ, किरण नगराळे, छोटूभाऊ चौधरी, फैसल अन्सारी, विलासराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व पदाधिकार्यांना आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसला नवचैतन्य : धुळे शहर काँग्रेसच्या पदाधिकार्यांच्या नियुक्तीमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.कार्यकारीणीत अनुभवी पदाधिकारी असून पक्षश्रेष्ठींच्या नेतृत्वाखाली भविष्यात अजून शहर काँग्रेस कार्यकारीणीचा विस्तार केला जाईल. धुळे शहर काँग्रेसने आजपर्यंत शहरातील सर्वसामान्य रहिवाशांच्या प्रश्नांना वाचा फोडली असून त्यासाठी आंदोलन, निदर्शन, निवेदन देवून शहरवासियांचा आवाज बुलंद केला आहे.यापुढेही धुळे शहराच्या विकासाठी व जनतेच्या सोयी सुविधेसाठी शहर काँग्रेस काम करेल अशी प्रतिक्रीया जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे यांनी दिली आहे.