रमजान ईदसाठी ‘आनंदाचा शिधा’ वाटप करा! मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचना
धुळे : रमजान ईद सणासाठी ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या विभागाला दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ईर्शादभाई जहागिरदार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या धुळ्यातील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईत मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. रमजान महिन्यात आनंद शिधा मिळण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. मंत्री भुजबळ यांनी पत्र स्वीकारताच मागणीची दखल दखल घेतली आणि याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे रमजान महिन्यात आनंद शिधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते ईर्शादभाई जहागिरदार यांच्या पाठपुराव्यामुळे रमजानच्या आनंद शिधाचा लाभ संपूर्ण राज्याला होणार आहे.
![](https://i0.wp.com/no1maharashtra.com/wp-content/uploads/2024/03/irshad-jahagirdar-news-2024-no1maharashtra.png?resize=300%2C135&ssl=1)
मंत्री भुजबळ यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागिरदार, धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, धुळे शहर कार्याध्यक्ष जावेद बिल्डर व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.