• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

BJP News खासदार डॉ. भामरे यांना तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी करा : बावनकुळे

no1maharashtra by no1maharashtra
30/03/2024
in धुळे, राजकारण
0
BJP News खासदार डॉ. भामरे यांना तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी करा : बावनकुळे
0
SHARES
141
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळ्यातील वाणी समाजाचे नेते राजेंद्र पाचपुते यांचा समर्थकांसह भाजप प्रवेश

धुळे : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत प्रत्येक बूथवर ५१ टक्के मते घेऊन भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्रजी मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, यासाठी काटेकोर नियोजन करा. त्यांच्या नेतृत्वात विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनाही तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी करत संसदेत पाठवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
जाहिरात
धुळे शहरासह जिल्ह्यातील वाणी समाजाचे नेते तथा महाराष्ट्र वाणी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष, मिल परिसरातील आराधना शोरूमचे संचालक, यशस्वी बांधकाम व्यावसायिक राजेंद्र परशुराम पाचपुते यांनी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली  आज भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते. श्री. बावनकुळे यांनी श्री. पाचपुते यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले.
बावनकुळे म्हणाले, की धुळे येथील लाडशाखीय वाणी समाजाचे नेते राजेंद्र पाचपुते यांनी आज आपल्या समाजबांधव व समर्थकांसह केलेला भाजप प्रवेश स्वागतार्ह आहे. श्री. पाचपुते यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करतो व त्यांना शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी पक्षात सतत कार्यरत राहावे. मोदीजींचा नमस्कार तसेच मोदीजींच्या विकसित भारताची गॅरंटी घरोघरी पोहोचवावी. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करताना आणखी संघटनात्मक मजबुती आणावी. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत सर्वांनी झपाटून काम करताना प्रत्येक बूथवर पक्षाच्या उमेदवारांना ५१ टक्के मतदान घेऊन मोदीजी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, याचा निर्धार करावा. तसेच लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनाही तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी करत संसदेत पाठवावे, असे आवाहनही श्री. बावनकुळे यांनी केले.
पाचपुते यांच्यासह यांनीही केला पक्षप्रवेश : राजेंद्र पाचपुते यांच्यासह योगेश येवले,धनराज पाटिल,सुनिल मोरे,संदिप पाटील,योगेश पाटील,तुषार मोरे,पवन बागड,विकी बोरसे,वासु पाटील,राकेश पाटील, गोपाल पाटील, वैभव माळी, शामजी देव,गजाननजी नाकवे,निरंजनजी कोठावदे,चंद्रकांतजी शिनकर,भूषणजी दशपुते, एकनाथ पाटील यांनीही प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे व जिल्हाध्यक्ष आंपळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.
पाचपुते यांचा अल्प परिचय : लाडशाखीय वाणी समाजाचे युवा नेते तथा महाराष्ट्र वाणी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाचपुते हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे जिल्ह्यासह राज्यातील वरिष्ठ नेत्यांशीही चांगले संबंध असून, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक तसेच कापड शोरूमचे संचालक आहेत. 2008 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून धुळे महापालिकेची निवडणूकही लढविली होती. स्वामी विवेकानंद शैक्षणिक सेवाभावी संस्था आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. धुळे क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही ते काम पाहत आहेत. जानेवारी 2019 मध्ये वाणी समाजाच्या 20 हजार महिला भगिनींच्या उपस्थितीत त्यांनी भोगी महोत्सव यशस्वी केला होता.
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात वाणी समाजाचे 45 ते 50 हजार मतदार आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचून भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांना समर्थन मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. डॉ. भामरे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅट्ट्रिक साजरी करणे आनंददायी ठरेल. – राजेंद्र पाचपुते, धुळे
No.1 Maharashtra
Tags: bjp newsDhule BJP Newsdhule newsdr subhash bhamare mp dhuleGajendra Amplkar BJP Dhulegirish mahajan ministerLoksabha Election Dhule 2024
ADVERTISEMENT
Previous Post

ACB Trap शिक्षिकेकडून एक हजारांची लाच घेणारा मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

Next Post

MLA Kunal Patil आमदार कुणाल पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारक, महाराष्ट्रात लोकसभा प्रचाराची जबाबदारी

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us