लोकांचा सर्वांगीण विकास केवळ भाजपकडूनच शक्य
शिरपूर : लोकांचा विकास कसा करता येई शकतो याचे नियोजन करण्याची आणि अंमलबजावणीची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षातच आहे. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यास विकासाला दुप्पट चालना मिळू शकेल. माझ्यासह खासदार डॉ. हीना गावित, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, आमदार कांशीराम पावरा यांनी शिरपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. ती कायम राहावीत, समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत फायदा पोहचवायचा असेल तर भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले.
नंदुरबार लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी 20 एप्रिलला सुळे येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
हेही वाचा
डॉ. हिनाताई गावीत यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या : आमदार काशीराम पावरा