डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयासाठी त्यांचे सुपुत्र डॉ. राहुल भामरे मैदानात
धुळे : भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयासाठी त्यांचे सुपुत्र डॉ. राहुल भामरे आणि पक्षाचे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी कंबर कसली आहे. या दोघांसह महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आदिशक्ती एकवीरा देवींच्या चरणी नारळ वाहून विविध भागांमध्ये प्रचारात आघाडी घेतली आहे.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभाग चारमधील नागरिकांच्या भेटी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणकर नेतृत्वाकड़े पुन्हा एकदा देशाची धुरा सोपविण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही केले.
यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, डॉ. राहुल भामरे, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे, आरपीआय जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, शिवसेना शहरप्रमुख संजय वाल्हे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, भाजप जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर, ओमप्रकाश खंडेलवाल, चेतन मंडोरे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी बेलपाठक, डॉ. माधुरी बोरसे, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, नगरसेवक अरुण पवार, आरती पवार, भगवान गवळी, देवेंद्र सोनार, नरेश चौधरी, राजेश पवार, दगडू बागूल, योगिता बागूल, प्रशांत बागूल, भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगराध्यक्ष आकाश परदेशी, महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा वैशाली शिरसाट, उपाध्यक्ष सूरज चौधरी, राजेंद्र खंडेलवाल, शरद चौधरी, कमलाकर पाटील, शेखर कुलकर्णी, बिपीन रोकडे, योगेश कोठावदे, सागर चौधरी, रमेश करनकाळ, श्री. मुजगे, जयवंत वानखेडकर, मंडळाध्यक्ष सुबोध पाटील, विनोद खेमनर, युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस पंकज धात्रक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.