‘वंचित’चे उमेदवार जितुभाऊ शिरसाठ यांचे नामनिर्देशन पत्र दाखल, समर्थकांची उत्स्फूर्त महारॅली
धुळे : वंचित बहुजन आघाडीचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी नगरसेवक जितेंद्र उंदा शिरसाठ यांनी सोमवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडरक यांना अभिवादन करीत भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील बहुजन समाजातील असंख्य तरुण या रॅलीत सहभागी झाले.शहरातील साक्री रोडवरील भिमनगर येथून सोमवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जितेंद्र शिरसाठ यांच्या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रविकांत वाघ, युवा जिल्हाध्यक्ष योगेश पगारे, राहुल पाटोळे, आकाश बागुल, अमोल पवार, सागर चव्हाण, रहिम पटेल, सिरायत खाटीक, कमरुद्दीन खाटीक, चंद्रमणी वाघ आदी उपस्थित होते.
साक्री रोडवरुन निघालेल्या रॅलीत महिला, पुरुष, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी पोहचली असता जितेंद्र शिरसाठ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली. तेथे त्यांनी वरीष्ठ नेत्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.