भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आ. काशिराम दादा पावरा यांच्या प्रचारार्थ 5 नोव्हेंबर रोजी वाढविण्यात येणार प्रचार नारळ
शिरपूर : शिरपूर विधानसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आमदार काशिराम दादा पावरा यांच्या प्रचारार्थ 5 नोव्हेंबर 2024 मंगळवार रोजी सकाळी प्रचार नारळ वाढविण्यात येणार आहे.
माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, भारतीय जनता पार्टी व महायुतीचे पदाधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, शिरपूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत 5 नोव्हेंबर 2024 मंगळवार रोजी सकाळी 8 वाजता खालचे गाव बालाजी मंदिर येथे प्रचारार्थ नारळ वाढविण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता श्री दत्त मंदिर, खर्दे बु. येथे प्रचार नारळ वाढविण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.