#Ahmadnagar Crime अहमदनगर : नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कारवाई केली. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी महिला डॉ. सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे.
#प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत समुदाय वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिलेला निम्मा पगार लाच मागणाऱ्या डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी- कोरडे (वय ३९ वर्ष, वैद्यकिय अधिकारी, वर्ग २ (गट अ) प्राथमिक आरोग्य केंद्र, बारागांव नांदूर, ता- राहुरी) यांना अटक करण्यात आली आहे.
#या प्रकरणातील तक्रारदार महिला समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीला आहेत. त्यांचा ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ या दोन महिन्यांचा कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता तसेच ऑक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळणे बाकी होते. तो मिळावा म्हणून त्यांचे वरिष्ठ असलेल्या महिला अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांची दोन महिन्यांपूर्वी भेट घेऊन विचारणा केली होती. तेव्हा आरोपी सूर्यवंशी यांनी ‘तुला मिळणाऱ्या रक्कमेच्या निम्मी रक्कम मला द्यावी लागेल,’ असे सांगितले होते.
या प्रकरणातील तक्रारदार महिला समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीला आहेत. त्यांचा ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ या दोन महिन्यांचा कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता तसेच ऑक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळणे बाकी होते. तो मिळावा म्हणून त्यांचे वरिष्ठ असलेल्या महिला अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांची दोन महिन्यांपूर्वी भेट घेऊन विचारणा केली होती. तेव्हा आरोपी सूर्यवंशी यांनी तुला मिळणाऱ्या रक्कमेच्या निम्मी रक्कम मला द्यावी लागेल,’ असे सांगितले होते.
#लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, चालक पोलीस हवालदार हरुन शेख यांनी ही कारवाई केली.