नवी दिल्ली: सूर्याबाबत (sun) शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक बाब सांगितली आहे. सूर्याचा एक मोठा भाग तुटल्याचे समोर आले आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, हा तुटलेला भाग सूर्याभोवती चक्रीवादळासारखा फिरतो आहे.
या घडामोडीमुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. ही संपूर्ण घटना नासाच्या (#nasa) जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने (jems web space teliscope) रेकॉर्ड केली आहे. सूर्याचा एक मोठा भाग त्याच्यापासून वेगळा झाला आहे, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. विशेष म्हणजे हा तुटलेला भाग अजूनही सूर्याभोवती फिरतो आहे. ही घटना का आणि कशी घडली हे शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ सध्या करत आहेत.
#या अनोख्या घटनेचा व्हिडीओ (video) हवामान अंदाज तज्ज्ञ डॉ. तमिता स्कोव्ह (dr. tamitha scovhe) यांनीही ट्विटरवर शेअर केला होता. सूर्य हा सौर उष्णतेचा एक मोठा स्रोत आहे. कधीकधी याचा पृथ्वीवरील दळणवळणावर मोठा परिणाम होतो, त्यामुळे शास्त्रज्ञ सूर्याच्या या नवीन विकासाबद्दल अधिक चिंतित आहेत.
#नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काही दिवसांपूर्वी या अनोख्या घटनेची नोंद केली होती. हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या डॉ. तमिता स्कोव्ह यांनी सोशल मीडियावर या शोधाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की सूर्याचा उत्तरेकडील एक भाग सूर्यापासून वेगळा झाला आहे आणि एका मोठ्या चक्रीवादळाप्रमाणे सूर्याभोवती फिरत आहे.
Spaceweather.com च्या अहवालानुसार, मंगळवारी प्रशांत महासागरात मध्यम आकाराच्या शक्तिशाली सौर ज्वालामुळे शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआउट झाला होता. कोलोरॅडोच्या नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक रिसर्चचे उपसंचालक स्कॉच मॅकिंटॉश यांनी सांहितलं की सूर्याच्या प्रत्येक सौर चक्रात एकदा ५५ अंश अक्षांशावर काहीतरी विचित्र घडलं असामान्य नाही. तरीही, या नवीन चक्रीवादळासारखी घटना यापूर्वी आपण कधीही पाहिली नाही, असंही त्यांनी सांगितलं.