तरुणाईच्या पंखांना बळ देण्यासाठी झाला युवा संवाद; ‘मन की बात’मधून दिला राष्ट्रनिर्मितीचा संदेश
धुळे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश युवा मोर्चातर्फे धुळे येथे नॉर्थ पॉईंट स्कूलमध्ये रविवारी (ता. 26 ऑक्टोबर 2026) ‘युवा संवाद’ आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव सिंधू रेड्डी, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, बापू खलाणे, दत्ता चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सह संयोजक सुदर्शन यादव, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रदेश सचिव अतुल जैन, युवती प्रदेश प्रमुख शांभवी साळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी, महादेव परदेशी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
युवा संवादाच्या माध्यमातून तरुणाईशी साधला संवाद : युवकांच्या विचारांना व्यासपीठ देत, राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून प्रेरणादायी विचारांचे श्रवण करण्यात आले.
नव्या भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका महत्त्वपूर्ण असून, देशाच्या विकासासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.
युवा शक्ती, राष्ट्रनिर्मिती आणि नवभारताचा संकल्प! अशा उत्साही वातावरणात धुळ्यातील युवा संवाद आणि ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.















