पदोन्नती आरक्षण, मागासवर्गीयांचा अनुशेषः कर्मचारी संघटनांचे शुक्रवारी धरणे आंदोलन
#dhule धुळेः पदोन्नतीतील आरक्षण (#promoion reservation) व मागासवर्गीयांचा अनुशेष (#backlog) भरण्याबाबतची टाळाटाळ या राज्य शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कास्ट्राईब कर्मचारी महासंघ (kastraib karmchari mahasangh) व संलग्न शाखांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 24 रोजी ‘लोकशाही की पेशवाई’ या बॅनरखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
त्याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना देण्यात आले. निवेदन देताना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष डॉ. आखाडे, जिल्हा कार्याध्यक्ष दुर्गेश बोरसे (#durgesh borase), वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुनंद भामरे, गणेश कोकणी, संदीप भामरे, अनिल मंगळे, महिला संघटक बबीता पटले (babita patale), आशा चव्हाण (asha chavan) आदी उपस्थित होते.