धुळे(Dhule): सोनगीर टोलनाक्यावर (#sonagir-toll-plaza) गेल्या अनेक वर्षांपासुन कार्यरत प्रसाद शरद मोरे वय-32 राहणार-धुळे या कर्मचार्याला कामावरुन कमी केले म्हणून त्याने प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. दरम्यान, या कर्मचार्यावर टोल प्रशासनाने अन्याय केला असून, त्याला त्वरीत कामावर घ्यावे, अशी मागणी करणारे निवेदन भीम आर्मी (bhim-army) भारत एकता मिशनच्या (bharat-ekata-mission) पदाधिकार्यांनी पालकमंञी गिरीश महाजन यांना दिले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अॅड. राहुल वाघ (adv-rahul-wagh), गौतम गायकवाड, वसीम शेख, संजय अहिरे, सत्तार सय्यद, उत्तम झनके, भैया वाघ आदी उपस्थित होते.