ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव; भाजप नेते विनोद तावडेंसह विविध मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीत कार्यक्रम
धुळे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त उद्या (ता. ५) अभीष्टचिंतनासह सन्मानपत्र प्रदानाचा मुख्य कार्यक्रम होईल. येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील टॉपलाइन रिसॉर्टमध्ये सायंकाळी ६.३० वा. होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन श्री. ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल अमृतमहोत्सव समिती व शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी केले.
श्री. अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारपासून दोन दिवस विविध कार्यक्रम होत आहेत. यात रविवारी गोपूजन, दुष्काळग्रस्त ११ शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी मदत म्हणून ११ गायींचे दान, दुष्काळ निधीसाठी अग्रवाल कुटुंबीयांतर्फे ११ लाखांचा धनादेश देण्यासह सायंकाळी वरुणराजाला साकडे घालणारा प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांचा तसेच साधो बँडचा भजनसंध्येसह भक्तिमय गीतगायनाचा कार्यक्रम झाला.
आज तावडेंसह विविध नेत्यांची हजेरी : सोमवारी (ता. ५) सायंकाळी साडेसहाला शहरातील टॉपलाइन रिसॉर्टमध्ये श्री. अग्रवाल यांच्या अभीष्टचिंतनासह अमृतमहोत्सव समितीतर्फे सन्मानपत्र प्रदान तसेच त्यांच्या सत्काराचा मुख्य कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार विनोद तावडे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, दुग्धविकासमंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, सार्वजनिक आरोग्य व ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आदी प्रमुख पाहुणे असतील. मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती अग्रवाल यांना अमृतमहोत्सव समितीतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.
हे असतील प्रमुख मान्यवर : या कार्यक्रमास आमदार सर्वश्री अमरिशभाई पटेल, मंगेश चव्हाण, नंदकिशोर महाजन, काशिराम पावरा, मंजुळा गावित, अनिल पाटील, राहुल ढिकले, राम भदाणे, राजूमामा भोळे, अमोल जावळे, राजेश पाडवी, दिलीप बोरसे, देवयानी फरांदे, चंद्रकांत रघुवंशी, सीमा हिरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे असतील.














Comments 1