#new delhi नवी दिल्लीः आपल्या जमिनीपासून हजारो दूर अंतराळात होणाऱ्या घटनेसंबंधी तुम्हाला जर आवड असेल तर १ फेब्रुवारीची रात्र तुमच्यासाठी खास ठरणार आहे. एक हिरवा धुमकेतू (Green Comet) जवळपास ५० हजार वर्षांनंतर पृथ्वीजवळून जाणार आहे. खगोलीय घटनेनुसार, हा धुमकेतू अन्य धुमकेतूपेक्षा वेगळा आहे. एक तर याचा रंग हिरवा आहे. तसेच हा पृथ्वीच्या जवळून जात आहे.
५० हजार वर्षांनंतर येतोय हिरवा धुमकेतू
हा धुमकेतू सूर्याभोवती फिरतो आहे. तसेच यासाठी याला ५० हजार वर्ष पूर्ण झाले आहेत. या महिन्याच्या १२ तारखेला हा धुमकेतू सूर्याच्या जवळ गेला होता. आता तो पृथ्वी जवळून जाणार आहे. वैज्ञानिकाच्या माहितीनुसार, गेल्या वेळी हा धुमकेतू पृथ्वीच्या जवळून गेला होता त्यावेळी निएंडरथल मानव (Neanderthal) राहत होते. या धुमकेतूचे नाव C/2022 E3 (ZTF) ठेवले गेले आहे.
उघड्या डोळ्यांनी पाहता येणार हे अद्भूत दृश्य
३० जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत हा धुमकेतू पृथ्वीच्या जवळून जामार आहे. १ फेब्रुवारी रोजी हा सर्वात जवळून जाणार आहे. रात्रीच्या वेळी या धुमकेतूला उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा धुमकेतू धूळ आणि बर्फाने बनलेला आहे. तसेच याचा रंग हिरवा आहे. आपल्या दुर्लभ रंगामुळे याच्या चारही बाजुला हिरवा रंगाचा प्रकाश दिसतो. ज्यावेळी पृथ्वीच्या सर्वात जवळून जात असेल त्यावेळी या धुमकेतूचे अंतर २.७ कोटी किलोमीटर असेल.
भारतात दिसणार हिरवा धुमकेतू
रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत हे Green Comet संपूर्ण भारतात दिसेल. तर ओडिशात याला सर्वात जवळून पाहता येणार आहे. रात्री याला तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. परंतु, टेलिस्कोपची मदत घेतल्यास हा नजारा आणखी खास दिसू शकतो.