धुळे (Dhule) : राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक (football club bayarn munic jurmany), जर्मनी यांचेशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने (krida-youvak-kalyan) करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल. खेळाडु व क्रीडा मार्गदर्शक यांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबध्द प्रशिक्षण, पायाभुत सुविधा यांना चालना मिळणार आहे.
एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांचे करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी मुद्दा नमुद असुन याअंतर्गत राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या ” एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप (f. c. bayarn maharashtra cup) स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करुन त्यातुन निवडलेल्या २० खेळाडुना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे, तेथील निवास, प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे.
२० खेळाडु प्रशिक्षणासाठी जर्मनी
राज्यातुन २० खेळाडु जर्मनी येथे सदर प्रशिक्षणासाठी जाण्याकरिता क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. या फुटबॉल स्पर्धा १४ वर्षाखालील मुलांच्या गटात घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन व फुटबॉल क्लब बायर्न व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने खालीलप्रमाणे १४ वयोगट मुले यांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्पर्धा प्रकार
एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप (फुटबॉल) स्पर्धा १४ वर्षे वयोगटासाठी 8 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी ९.३० वा. जिल्हा क्रीडा संकुल, वाडीभोकर रोड, देवपुर, धुळे येथे रईस काजी, सचिव, फुटबाल असो. धुळे मो. ८९५६१३०६७९, मोहसिन शेख – खेलो इंडिया मार्गदर्शक, धुळे मो. ९६८९९८८८९०, अभिजीत भामरे, खेलो इंडिया मार्गदर्शक, धुळे मो.७९७२५९६६३३, रेखा पाटील, क्रीडा अधिकारी मो. ९४२१६९ ३४७१ यांचेशी संपर्क साधावा.
एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप (फुटबॉल) स्पर्धेकरिता सहभागी होणाऱ्या खेळाडुंसाठी वयोगट १४ वर्षाखालील मुले, दिनांक 1 जानेवारी, 2009 नंतर जन्मलेला असावा., खेळाडू संख्या मुले २० व मार्गदर्शक व्यवस्थापक २ अशी एकुण २२ राहील.
जिल्हास्तर एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप (फुटबॉल) १४ वयोगट मुले यांच्या स्पर्धेत जिल्ह्यात विजयी झालेला संघ व हारलेल्या संघातुन ५ खेळाडु निवडचाचणी करिता पुढील विभागस्तर स्पर्धेकरिता पाठविण्यात येणार आहे. विभागस्तरावर विजयी झालेले संघ व विभागातुन निवडचाचणी करिता निवडण्यात आलेले खेळाडु यांना पुढील राज्यस्तर स्पर्धेकरिता पाठविण्यात येतील. त्यानंतर राज्यस्तरावर निवड चाचणी घेण्यात येवुन त्यामधुन २० खेळाडु बायर्न म्युनिच, जर्मनी येथे जाण्यासाठी निवडण्यात येणार आहेत. यासाठी खेळाडुने सोबत आधारकार्ड, पॅन कार्ड, बोनाफाईड प्रमाणपत्र, निवास अनुषंगाने लाईट बिल, तसेच निवासासाठी भाडयाने रहात असल्यास त्याबाबतचा करार इ. कागदपत्र स्पर्धेकरिता खेळाडु सोबत द्यावयाची आहे.
एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप (फुटबॉल) वयोगट १४ मुले करिता प्रथम शाळांनी, क्लब व फुटबॉल संघटना तसेच शैक्षणिक संस्था यांनी आपल्या स्तरावर वयोगट १४ मुले यांच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करुन त्यामधुन उत्कृष्ठ फुटबाल खेळणाऱ्या खेळाडुंची निवड करुन जिल्हास्तर एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल वयोगट १४ मुले याकरिता आपल्या शाळेचा/संघटनेचा/क्लब/संस्था यांचे संघ वरील जिल्हास्तर कार्यक्रमानुसार सहभागी करावयाचा आहे. या स्पर्धेत विजयी प्रथम तीन संघास प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तरी सदर एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप (फुटबॉल) वयोगट १४ मुले स्पर्धेकरिता जास्तीत जास्त संघानी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.














