• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

4th Ahirani Sahitya Sammelan Dhule अहिराणी साहित्य संमेलनात रंगल्या कवितांच्या मैफिली

संस्कृत ही भषांची जननी नव्हे तर अनेक भाषांची खिचडी : प्रा. डाॅ. वासुदेव मुलाटे

no1maharashtra by no1maharashtra
05/03/2024
in धुळे
0
0
SHARES
57
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहिराणी साहित्य संमेलनात रंगल्या कवितांच्या मैफिली

धुळे : संस्कृत ही भषांची जननी नव्हे तर अनेक भाषांची खिचडी आहे. जी भाषा ठराविक लोकांसाठी होती त्या भाषेचा अभिमान का बाळगावा? बहुजनांच्या भाषा बोलीभाषा आहेत. त्यामुळे आपण आपल्या बोलीभाषा जपल्या पाहिजेत, असं मत १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा साहित्यिक प्रा. डाॅ. वासुदेव मुलाटे यांनी अहिराणी संमेलनात व्यक्त केलं. धुळे येथे रविवारी पार पडलेल्या चौथ्या अहिराणी संमेलनात रंगलेल्या कवितांच्या मैफिलीला अहिराणी रसिकांनी भरभरून दाद दिली.
आपला देश खऱ्या अर्थाने खेड्यातला आणि शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे त्यांचीच भाषा ही खरी अभिजात भाषा असून या हिशोबाने अहिराणी ही अभिजात भाषा ठरते. सरकारकडे भिक्षेची झोळी पसरण्याऐवजी आपणच आपल्या बोली भाषांना सन्मान देणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमात ही भाषा यावी यासाठी प्रयत्न करावेत आणि असे झाल्यास संमेलनाचे हे यश ठरेल असे प्रतिपादन १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा साहित्यिक प्रा. डाॅ. वासुदेव मुलाटे यांनी अहिराणी संमेलनात व्यक्त केले.
अहिराणी साहित्य परिषद धुळे आणि विद्यावर्धिनी सभा धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यावर्धिनी महाविद्यालयात स्व. अण्णासाहेब सदाशिव माळी साहित्य नगरीत चौथे अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा. डाॅ. मुलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे चेअरमन अक्षय छाजेड होते. तर स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील होते. व्यासपिठावर अहिराणी साहित्य परिषदेचे धुळ्याचे अध्यक्ष प्रा. भगवान पाटील, कोल्हापूरचे प्रतापराव पाटील, माजी न्यायाधीश जे. टी. देसले, किशोर ढमाले, केशव बहाळकर, बाबा हातेकर, डॉ. दरबारसिंग गिरासे, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अनिल दामोदर, प्राचार्य संजीव गिरासे, प्राचार्य डॉ. मधुकर वानखेडे, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, प्रा. डॉ. शशीकला पवार, शकुंतला बोरसे, कलावती माळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रकाश महाले यांच्या लोभी मामांस्ना परलोभी पोरी आणि वनमाला पाटील यांच्या पांझरा नदीन्या थडीकाठन्या कविता या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
प्रा. डॉ. मुलाटे म्हणाले, मराठीचा अभ्यासक असूनही अहिराणी बोलता येत नाही ही खंत आहे. भाषा हे मनातले माध्यम असावे. समज, काही गैरसमज असू शकतात पण आपल्या आईची भाषा हीच खरी भाषा असते. पण, आम्ही तिला आज विसरत आहोत. अनेक भाषांची जननी म्हणून संस्कृतकडे पाहण्यात येते, मुळात हे चुकीचे आहे. भाषा कोणतीही असू देत शेवटी माणसं महत्वाची आहेत. पण आज माणसांकडे दुर्लक्ष केले जात आहे. संवाद हेच प्रभावी माध्यम आहे. पाठ्यपुस्तक ही त्या त्या भाषेतून यायला हवी. अभ्यासक्रमात अहिराणी भाषेचा समावेश असावा आणि यासाठी सर्वांचे सामुहीक प्रयत्न होणे अपेक्षित आहे. असे झाल्यास संमेलानाचे हे यश ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्वागताध्यक्ष प्रा. शरद पाटील म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषांना आणि बोलीभाषांना महत्त्व मिळते आहे, याचा लाभ घेत आपण या भाषांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अहिराणीला भाषेचा दर्जा मिळायला हवा. ही लोकप्रिय भाषा असून तिचा योग्य ताे सन्मान झाला पाहीजे.
अध्यक्षीय भाषणात अक्षय छाजेड म्हणाले की, अहिराणी भाषेतील म्हणींचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. भाषेची व्याप्ती आणि सौंदर्य हे त्यातील म्हणीतून प्रकट होत असते. मायबोलींचा समावेश शिक्षणात करत आहेत ही गोष्ट चांगली असून नव्या शैक्षणिक धोरणात शाळांच्या एकत्रीकरणामुळे मुले शिक्षणापासून वंचित होतील की काय याचाही विचार होणे आवश्यक आहे. अहिराणी भाषा ही समृद्ध भाषा आहे. तिला योग्य ते मंच उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. भाषेच्या समृध्दीसाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सुत्रसंचालन आणि परिचय प्रा. प्रभाकर शेळके यांनी करुन दिला. उपस्थितांचे आभार माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी मानले. अहिराणी प्रेमी उपस्थित होते.
No.1 Maharashtra
Tags: 4th Ahirani Sahitya Sammelan DhuleAhirani Boliahirani songsAkshay ChajedBolibhashadhule newsKhandeshi Bolimla kunal patilNo.1 MaharashtraProf. Dr. Vasudeo MulateProf. Sharad Patil Ex MLA
ADVERTISEMENT
Previous Post

Khalid Shekh selection in Maharashtra T20 team धुळ्याचा ऑलराऊंडर खेळाडू खालिदची टी-20 च्या महाराष्ट्र संघात निवड

Next Post

Nandurbar Saras Mahotsava उमेदी महिलांच्या सरस महोत्सवाला नंदुरबारकरांचा भरभरून प्रतिसाद

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Nandurbar Saras Mahotsava उमेदी महिलांच्या सरस महोत्सवाला नंदुरबारकरांचा भरभरून प्रतिसाद

Nandurbar Saras Mahotsava उमेदी महिलांच्या सरस महोत्सवाला नंदुरबारकरांचा भरभरून प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us