#dhule crime धुळेः गावठी बनावटीचा कट्टा (gavathi-katta) वापरुन धुळे शहरात भाईगिरी करणार्या तरुणाला पोलिसांनी (police) बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील चाळीसगाव रोड चौफुली परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या (dhule local crime branch) पथकाने एका संशयीताला गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूससह ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती. मोहंमद शाहीद रियाज अहमद (रा. हाजी नगर, इसाक मशिदीजवळ धुळे) हा तरुण दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे गावठी पिस्तुल बाळगत फिरत असतो. तो चाळीसगांव रोड चौफुली परिसरात दिसून आला आहे. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. एलसीबच्या पथकाने मोहंमद याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट पिस्तुल आणि जिवंत काडतूस आढळून आले.
दहशत माजवण्यासाठी कमरेला गावठी कट्टा लावून भाईगिरी करणाऱ्या मोहम्मदला पकडले. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनात पथकाने ही धडक कारवाई केली. याबाबत पोलिस अधिक्षक संजय बारकुंड (sanjay barkund, sp dhule) यांनी माहिती देत कारवाईचे कौतुक केले. त्याने हे पिस्तुल कोणाकडून आणले आणि त्याचा यामागे काय उद्देश होता याचा तपास आता पोलिस करीत आहेत.













