नेहमीच चर्चेत राहणारी आलिया भट्ट…
नंबर वन महाराष्ट्र ऑनलाईन डेस्क : ग्लॅमरस लूक, मनमोहक अदा, उमदा अभिनय आणि काहीतरी वेगळं करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारी आलिया भट्ट (Alia Bhatt) नेहमीच चर्चेत राहणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या ‘होप गाला’ या चॅरिटी सोहळ्यात तिने हजेरी लावली.
आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये ती या कार्यक्रमात गायिका हर्षदीप कौसरसोबत ‘इक कुडी’ हे गीत गाताना दिसत आहे. हे गाणे 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या सिनेमातील आहे. आलियाने या सिनेमाच्या संगीत अल्बमसाठी गायक अभिनेता दिलजीत दोसांझसोबत या गाण्याचे क्लब मिक्स वर्जनही गायिले आहे. लंडनच्या मंदारीन ओरिएंटल हाइड पार्कमध्ये झालेल्या या सोहळ्यात आलिया दोन लुकमध्ये दिसली. रेड कार्पेट सोहळ्यात आलीया एका डिझायनर वन पीस लुकमध्ये दिसली. मुख्य सोहळ्यासाठी तिने सेलिब्रेटी डिझायनर अबुजानी संदीप खोसला यांची विंटेज साडी घातली होती. हाताने बनवलेली फ्लोरल सिल्क साडी 1994 मध्ये तयार केली होती.
आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आलिया म्हणाली की, ही संध्याकाळ विशेष होती. कारण ती खूप प्रेम, उद्देश आणि आशेने भारलेली होती. कार्यक्रम होस्ट करताना मला खूपच आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्यक्त केली आहे.