अजमेरला रोजे पूर्ण करणाऱ्या अर्जुन पवार यांचा दाता सरकार ग्रुपतर्फे सत्कार
धुळे : अजमेर शरीफ येथे 30 दिवसांचे रोजे पूर्ण करून 10 दिवस सेवा दिल्याबद्दल भिमबुध्द सिल्वर सेवाभावी संस्थेचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन पवार यांचा खानदेश कुतुब हजरत दाता सरकार ग्रुपतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जागतिक उपाध्यक्ष जोसेफ मलबारी, दाता सरकार ग्रुप संस्थापक अध्यक्ष बबन थोरात, दाता सरकार ट्रस्टचे अध्यक्ष आरिफ पठाण, जविद दादा, नझिम भाई, भिमबुद्ध सिल्वर सेवाभावी संस्था महाराष्ट्र संस्थापक राजुबाबा पवार, रेखा पवार, आम्रपाली पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.