• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule Loksabha धुळे लोकसभेची गणितं उलटली, महाविकास आघाडीला ओव्हर काॅन्फीडन्स!

no1maharashtra by no1maharashtra
06/05/2024
in धुळे, राजकारण
0
0
SHARES
342
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे लोकसभेची गणितं उलटली, महाविकास आघाडीला ओव्हर काॅन्फीडन्स!

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुर रेहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघाची गणितं उलटली आहेत. अल्पसंख्यांकांच्या मतांवर डोळा असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांचा विजय निश्चित असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू असली तरी महाविकास आघाडी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये स्वतःचं नुकसान करून घेईल, असं राजकीय विश्लेषकांच मत झालं आहे. कारण महाविकास आघाडी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या भरवशावर आहे. पण कुणालबाबा केवळ आमदार आहेत, देव नाहीत. त्यामुळे शोभाताईंच्या माणसांनी हवेत उडू नये, असा फुकटचा सल्ला इथले मतदार आपल्या गप्पांमधून देत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयपीएस अधिकारी अब्दुर रेहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला म्हणून शोभाताई बच्छाव यांचे समर्थक आणि कार्यकर्ते खूपच हवेत उडत असल्याचे बोलले जात आहे. परंतु धुळे शहरासह मालेगाव मध्यमध्ये अशी चर्चा आहे की, त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जास्त हवेत उडू नये. कारण वंचित बहुजन आघाडीचा अर्ज जरी बाद झाला असला तरी धुळे जिल्ह्याची जनता सुज्ञ आहे. कुणाल पाटील सांगतील म्हणून ते कुणालाही मतदान करणार नाहीत. जो उमेदवार अर्ध्या रात्री कामात येईल, त्या स्थानिक उमेदवाराला धुळे जिल्ह्याची जनता मतदान करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाल पाटील देव नाहीत; ते केवळ आमदार आहेत आणि ते स्थानिक आहेत म्हणून त्यांना इथल्या जनतेनं निवडून दिलं आहे. ते सांगतील म्हणून कोणत्याही उमेदवाराला इथल्या जनतेनं का मतदान करावं? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. कारण उद्या उठून ते पाकिस्तानातून एखादा उमेदवार घेऊन येतील आणि सांगतील की, “हा आमचा उमेदवार आहे. माझ्याकडे पाहून मतदान करा.” मग काय आम्ही मतदान करायचं का? अशी प्रश्नार्थक भावना इथल्या जनतेमध्ये आहे.
विरोध व्हायला आता सुरुवात झाली आहे. आगे आगे देखो होता है क्या…?  – सुनील बैसाणे, धुळे

धुळ्यात वंचितला धक्का! अब्दुर रेहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद

धुळे : लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून, छाननीअंती वंचितचे उमेदवार आयपीएस अधिकारी अब्दुर रेहमान यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला आहे. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अब्दुर रेहमान यांनी म्हटले आहे. वंचितांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने मुस्लीम मतांचा फायदा थेट काॅंग्रेसला होणार असल्याने भाजपच्या उमेदवाराची चिंता वाढली आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने आयपीएस अधिकारी अब्दुर रेहमान यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या नोकरीच्या राजीनाम्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. असे असताना वकिलांच्या सल्ल्याने त्यांनी शेवटच्या दिवशी 3 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु शासनाने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. ते शासकीय सेवेत असल्यामुळे लाभाच्या पदावर दिसत असल्याची त्रुटी काढून निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज 4 मे रोजी छाननीअंती बाद केला. अब्दुर रेहमान यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली होती. त्यामुळे त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला होता.
सन 2020 मध्ये दिला होता राजीनामा : उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर अब्दुर रेहमान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी सन 2020 मध्ये पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. मी राज्य शासनाचा कर्मचारी असल्याने महाराष्ट्र शासनाने माझा राजीनामा मंजूर केला आणि त्याबाबतची माहिती केंद्र शासनाला पाठविली. परंतु राजीनामा प्रस्ताव केंद्र शासनाने स्वीकारला नाही. त्यामुळे मी कॅटमध्ये अपिलात गेलो होतो. परंतु कॅटने देखील केंद्र शासनाच्या बाजूने निकाल दिल्याने मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचीकेवर सुनावणी सुरू असून, पुढील तारीख सहा मे देण्यात आली आहे. सहा मे रोजी निर्णय होणार आहे.
मी कोणत्याही लाभाच्या पदावर नाही : उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धुळे यांनी माझ्या अर्जाची आणि कागदपत्रांची खातरजमा करून अर्ज ओके असल्याचे म्हटले होते. परंतु निवडणूक आयोगाकडून या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र प्राप्त झाल्याने माझा अर्ज बाद करण्यात आला आहे. मी लाभाच्या पदावर असल्याने माझा अर्ज बाद केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पण मी कोणत्याही लाभाच्या पदावर नाही. मी नोकरी करत नाही, नोकरीचा पगार मला मिळत नाही, माझ्याकडे कोणतेही शासकीय वाहन अथवा शासकीय निवासस्थान नाही. त्यामुळे मी शासनाचा कोणताही लाभधारक नाही. म्हणून निवडणूक आयोगाने माझा अर्ज बाद करण्याचा दिलेला निर्णय नियमबाह्य असून, या विरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे अब्दुर रेहमान यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा थेट फायदा : धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य आणि धुळे शहर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये एमआयएमचे आमदार आहेत. असे असले तरी एमआयएमने उमेदवार दिलेला नाही. मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने अब्दुर रेहमान या मुस्लिम उमेदवाराला संधी दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी होणार होती आणि त्याचा थेट लाभ भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना होणार होता. परंतु अब्दुर रेहमान यांचा उमेदवारी बाद झाल्याने धुळे लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम मते काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना मिळतील असे बोलले जात आहे.
No.1 Maharashtra
Tags: Abdur Rehman IPS Dr. Subhash BhamareDhule Loksabhadhule newsDr. Gaurav BacchavDr. Shobha BacchavMayuri Bacchavmla kunal patil
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule Loksabha महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचाराचा झंजावात

Next Post

Apsara Movie “अप्सरा” १० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात, चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Apsara Movie “अप्सरा” १० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात, चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च

Apsara Movie "अप्सरा" १० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात, चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us