The bike caught fire at the petrol pump पेट्रोल पंपावर दुचाकी पेटली आणि एकच थरकाप उडाला
#Navapur नवापूरः नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यात विसरवाडी येथे एका पेट्रोल पंपावर दुचाकीला आग लागल्याने एकच थरकाप उडाला.
विसरवाडी येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका दुचाकीने अचानक पेट घेतला. हे पाहून पळापळ सुरु झाली. दरम्यान, प्रसंगावधान राखून पंपावरील कर्मचारी अमोल गावित याने तातडीने अग्निरोधक सिलिंडरचा वापर करत आग विझविली आणि मोठा अनर्थ टळला. या कर्मचार्याने आग विझवली नसती तर पेट्रोल पंपासह आजुबाजुचा परिसरही आगिच्या भक्ष्यस्थानी पडला असता. अमोल गावितच्या धाडसाचे सर्वजण कौतुक करत आहेत.